भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे यांचे कोरोनाने निधन

मुंबईतील रुग्णालयात सुरू होते उपचार

पालघर – पास्कल धनारे 2014 ते 2019 या काळात पालघरमधील हडाणू मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. कोरोना संक्रमणामुळे भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे यांचे सोमवारी मुंबईच्या एका खासगी रुग्णालयात निधन झाले. 49 वर्षांचे धनारे हे पालघरच्या डहाणू मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. यापूर्वी त्यांना वापीच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची परिस्थिती गंभीर झाल्यानंतर त्यांना मुंबईच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

डहाणूचे भाजपचे माजी आमदार व भाजपचे माजी पालघर जिल्हाध्यक्ष पास्कल हे होते. मुंबईतील नानावटी रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे. गेल्या दहा दिवसांपासून धनारे यांच्यावर गुजरातमधील वापी येथील रेम्बो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

मात्र रविवारी रात्री त्यांची तब्येत बिघडली यानंतर त्यांना मुंबईत हलवण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्यांची आज (सोमवार) सकाळी प्राणज्योत मालवली. पास्कल धनारे 2014 ते 2019 या काळात पालघरमधील हडाणू मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. यावेळी राज्यामध्ये भाजपा-शिवसेनेचे युती सरकार होते. आमदार पास्कल धनारे यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.