वॉशिंग्टन –अफगाणिस्तानमध्ये काही महिन्यापूर्वी तालिबान्यांनी आपली सत्ता स्थापन केल्यानंतर अनेक राजकारण्यांना विस्थापित व्हावे लागले. अनेकांना देश सोडून जावे लागले. पूर्वीच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या एका नेत्याला आत्ता चक्क अमेरिकेच्या रस्त्यावर टॅक्सी चालवण्याचे काम करावे लागत आहे.
खालिद पाइंदा असे या नेत्याचे नाव असून वॉशिंग्टनमधील रस्त्यावर तो आता टॅक्सी चालवण्याचे काम करीत आहे. उर्दू भाषेमध्ये खालीद त्याचा अर्थ स्थायी किंवा स्थिर असा आहे. पण खालीद यांच्या आयुष्यामध्ये काहीच स्थिर राहिले नाही. एकेकाळी अफगाणिस्तानचा सहाशे कोटी डॉलर्सचा खजिना सांभाळणार्या खालीद त्यांना आता आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोट टॅक्सी चालवून भरावे लागत आहे. खलिद यांची पत्नी आणि चार मुलेही वॉशिंग्टन मध्येच वास्तव्याला आहेत. जर दोन दिवसात पन्नास ट्रीप मी पूर्ण केल्या तर मला 95 डॉलरचा बोनस मिळेल आणि माझ्या कुटुंबाला हातभार लागेल असे विधान नुकतेच खालीद यांनी केले होते. जे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते. अफगाणिस्तान हा आमचा देश राहिलेला नाही आता आम्हाला अमेरिकेला आपला देश मानावा लागेल आणि टॅक्सी चालूनच आगामी कालावधीमध्ये मला कुटुंब चालवावे लागेल असे खालीद यांनी म्हटले आहे.