फॉर्म नंबर 17 भरण्यासाठी मुदतवाढ

नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

 

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी खासगीरित्या फॉर्म नंबर 17 भरून प्रविष्ठ होण्यासाठी ऑनलाइनद्वारे नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

फॉर्म नंबर 17 भरून परीक्षेस प्रविष्ठ होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणाचाही ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, ऑनलाइन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावत्याच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्राच्या शाळेत अथवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांच्या याद्या 5 जानेवारी रोजी जमा कराव्या लागणार आहेत, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ.  अशोक भोसले यांनी स्पष्ट केले.

कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर, मोबाइलद्वारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी संपर्कासाठी अनिर्वाय आहे. विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाइन देण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संपर्क केंद्रांकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेवून जाणे आवश्‍यक आहे. ऑनलाइन अर्ज भरताना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत 02025705207, 02025705208 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.