मुंबई – इंग्लंडमध्ये टी-20 क्रिकेटपेक्षाही वेगवान असे हंड्रेड क्रिकेट लीग (शंभर चेंडूंचा सामना) स्पर्धा लवकरच सुरु होणार आहे. आयपीएल आणि कॅरेबियन लीगमधील एकेका संघाचा मालक असलेला प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याने हंड्रेड लीगमधील एक संघ विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स या संघाचा मालक असलेला शाहरुख कॅरेबियन लीगमधील एका संघाचाही सहमालक बनला आहे. वेस्ट इंडिजमध्ये ही लीग लोकप्रिय आहे. आता तो हंड्रेड लीगमधीलही एका संघाचा मालक बनणार आहे.