भारतीय शेअर बाजारात परदेशी गुंतवणूक वाढली

करोनाविषयक अनिश्‍चित परिस्थितीच्या काळातही गेल्या वर्षी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय उद्योगाच्या उत्पादकतेवर विश्वास दाखविला होता. भारतीय शेअर बाजारानाही त्याना चांगला परतावा दिला आहे.

आता पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण झाली असूनही जानेवारी ते मार्च 2021 या तिमाहीत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीत तब्बल सात टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

आता परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात केलेली गुंतवणूक 552 अब्ज डॉलरवर गेली आहे. मार्च 2020 मध्ये परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक केवळ 281 अब्ज डॉलर इतकी होती.

रदेशी संस्थागत गुंतवणूकदार बऱ्याच बाबीचा विचार करून गुंतवणुकीचा निर्णय घेत असतात. याचा अर्थ भारतीय अर्थव्यवस्था आगामी काळात ताकतीने वाटचाल करणार असल्याचा घेतला जातो. 

यावरून इतर गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीचे निर्णय घेत असतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी भारतीय शेअर बाजार निर्देशांक अधिक परतावा देऊ शकतील असे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीवरून वाटते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.