म्युच्युअल फंड योजनेची निवड कशी कराल ?

बाजारात केवळ इक्विटी आणि डेट फंडांवर आधारीत किंवा त्यांचे मिश्रण असलेल्या योजना नाही तर वेगवेगळ्या थीमवर आधारीत योजनांपासून ते मार्केट कॅपिटलायझेशनवर आधारीत असंख्य योजना आहेत. अगदी म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांमध्येच दहा वेगवेगळ्या वर्गवारी पाहायला मिळतात तर डेट फंडात सोळाहून जास्त प्रकार पाहायला मिळतात.

म्युच्युअल फंडाची इक्विटी योजना कोणत्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक यावरून अनेक प्रकारची वर्गवारी पाहायला मिळते. उदाहरणार्थ – लार्ज कॅप इक्विटी फंड योजना या मोठ्या प्रमाणावर बाजार भांडवल असणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. मिडकॅप फंड हे मध्यम स्वरुपाचे बाजार भांडवल असणाऱ्या कंपन्यांमध्ये तर स्मॉलकॅप फंड हे कमी स्वरुपातील बाजार भांडवल असणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. त्याखेरीज मल्टीकॅप फंड योजना त्यांच्या नियोजनानुसार वरील तीनही प्रकारात गुंतवणूक करत असते. त्याखेरीज काही योजना विशिष्ट उद्योगक्षेत्रात किंवा संकल्पनाला धरून संबंधित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असतात.

विशिष्ट थीमवर आधारीत गुंतवणूक करणाऱ्या या योजनांना थिमॅटिक फंड असे संबोधले जाते. उदाहरणार्थ फक्त आयटी क्षेत्रातील कंपन्यात, बॅंका आणि वित्तीय संस्था किंवा आरोग्य आणि औषधे क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारा फंड.

म्युच्युअल फंडाची प्राथमिक पातळीवरील वर्गवारी – मल्टीकॅप, लार्ज कॅप, लार्ज अँड मिडकॅप, मिडकॅप फंड, स्मॉल कॅप फंड, डिव्हिडन्ड यिल्ड फंड, व्हॅल्यू फंड/कॉन्ट्रा फंड, फोकस्ड फंड, सेक्‍टरल/थिमॅटिक फंड आणि ईएलएसएस आता या वर्गवारीतून निवड कशी करायची आणि कुठल्या फंडात गुंतवणूक करायची? यातील काही वर्गातील योजना जास्त जोखमीच्या असू शकतात तर काहींमध्ये मोठे चढउतार होऊ शकतात.

मिड कॅप फंडांच्या तुलनेत स्मॉल कॅप फंडांमध्ये जोखीम जास्त असते. पुन्हा लार्ज कॅप फंडांच्या तुलनेत मिडकॅप फंडांमध्ये जास्त जोखीम असते. त्यामुळे यातील कुठल्या फंडात

गुंतवणूक करावी हे भविष
यातील तुमच्या गरजा (आर्थिक उद्दीष्टे), जोखीम घेण्याची तुमची क्षमता आणि शेअरबाजारातील परिस्थिती लक्षात घेऊन ठरवावे.
त्यामुळे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना आपण कोणत्या वर्गवारीतील कोणत्या योजनेत गुंतवणूक करतो आहोत हे समजून घेतले पाहिजे. त्यामुळे एकाच प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक होण्याची शक्‍यता संपते आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये बहुविविधता येण्यास मदत होते.

सगळ्या दहाही वर्गवारीतील योजना आपल्या खात्यात असल्याच पाहिजेत असे नाही. तुम्ही उच्च जोखीम असलेल्या किंवा मध्यम जोखीम असणाऱ्या फंडात गुंतवणूक करता की कमी जोखमी असलेल्या फंडात तुम्हांला गुंतवणूक करायची आहे याचा निर्णय तुम्ही घ्यायचा.
प्रत्येक इक्विटी फंड वर्गवारीत जेवढी जोखीम असते तेवढीच परताव्याची शक्‍यता असते.

या सगळ्याचा ताळमेळ कसा घालायचे हे तुम्हांला तुमचा फायनान्शियल अडव्हायजर सांगू शकतो. साधारणपणे 40 टक्के गुंतवणूक कमी जोखमीच्या योजनांमध्ये, 30 टक्के गुंतवणूक मध्यम जोखमीच्या योजनांमध्ये आणि 30 टक्के गुंतवणूक जास्त जोखमीच्या योजनांमध्ये करावी, असे सांगितले जाते.
-प्रतिनिधी

 

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना तुमचे अल्पकाळातील आर्थिक उद्दीष्ट, मध्यम कालावधीतील उद्दीष्ट, दीर्घकालीन उद्दीष्ट आणि तुमची जोखिम घेण्याची क्षमता यांचे गणित मांडून म्युच्युअल फंडाच्या कोणत्या योजनेत गुंतवणूक करणे योग्य ठरेल हे सुचवले जाते.

म्युच्युअल फंड योजनेची निवड कशी कराल?

=============

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.