मुंबई – पोर्नोग्राफीच्या प्रकरणामुळे राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांचा नात्यात दुरावा दिसून आला होता. या प्रकरणात पती राज कुंद्राला अटक केल्यानंतर बसलेल्या मानसिक धक्क्यातून शिल्पा शेट्टीने स्वत:ला आणि तिने कुटूंबाला सावरल्याचे दिसून आले होते. या प्रकरणावेळी सोशलवर अशा ही चर्चा होत्या की,’घटस्फोटाच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली होती.’
View this post on Instagram
मात्र या चर्चा फक्त अफवा असल्याचे आता दिसून येत आहे.शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यात सगळं काही आलबेल असल्याचं दिसत आहे. शिल्पा शेट्टीने नुकतीच एक पोस्ट शेअर केली असून यामध्ये त्यांनी नव्याने आपल्या नात्याला सुरुवात केल्याचं दिसत आहे.
सोशलवर शिल्पा शेट्टीने राज कुंद्रासोबत एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत दोघेही शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेताना दिसत आहेत. नवीन वर्षात पती राज कुंद्रासोबत शिल्पा शेट्टीची ही पहिली पोस्ट आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शिल्पाने राज कुंद्रासोबत एकही पोस्ट शेअर केली नव्हती. यातच तिने नव वर्षात सोशलवर व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडियोमध्ये साईबाबांसमोर हात जोडून उभे शिल्पा आणि राज दिसत आहे. या व्हिडियोला शिल्पा शेट्टीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “सबका मालिक एक, श्रद्धा और सबुरी. ओम साई राम”.