मुंबई – मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटीन असलेली स्कॉर्पिओ गाडी पार्क करताना एक व्यक्ती पीपीई किट घालून आलेली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती पोलीस अधिकारी सचिन वाझे होते की दुसरी कुणी? याचा तपास एनआयए आता करत आहे.
अंबानींच्या निवासस्थानाबहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवणाऱ्या स्कॉर्पिओ पाठोपाठ आलेली पांढरी इनोव्हा मोटार शनिवारी एनआयएने जप्त केली. ही मोटार मुंबई पोलिस दलातील अधिकाऱ्याची असल्याचे बोलले जाते. स्कॉर्पिओ पाठोपाठ आलेल्या इनोव्हा मोटारीचा तपास 25 फेब्रुवारीपासूनचे सीसीटीव्ही फुटेज पाहून करण्यात आला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्कॉर्पिओ गाडी अंबानी यांच्या घराजवळ पार्क करताना एक व्यक्ती पीपीई किटमध्ये दिसत असल्याचे एनआयएने सांगितले आहे. त्या व्यक्तीचा शोध घेण्यास एनआयएने सुरूवात केली आहे. जिलेटीन असलेली गाडी पार्क करण्यात आली, त्यावेळी वाझे घटनास्थळी उपस्थित होते का? पीपीई किटमध्ये वाझे होते की दुसरी व्यक्ती होती? या प्रश्नांच्या अनुषंगाने एनआयएने तपास सुरू केला आहे.
NIA is probing if the man who is seen in a CCTV grab near Antilia, wearing a PPE on the night when Scorpio was parked, is Sachin Waze or not. NIA is checking his alibi, CCTV footage etc: NIA Sources
— ANI (@ANI) March 15, 2021