पेठ- येथील पुणे जिल्हा सहकारी बॅंकच्या वतीने कर्जदारांसाठी बायोमेट्रिक पद्धतीने कामकाज सुरू केल्याची माहिती शाखा प्रमुख ए. एन. लोंढे यांनी दिली.
महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत थकबाकी कर्जदार सभासद लाभधारक पात्र शेतकऱ्यांचे शनिवार (दि. 29) पासून सातगाव पठारावरील सर्व सोसायट्यांचे बायोमेट्रिक आधारकार्ड प्रमाणीकरण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, पेठ शाखेमध्ये सुरू झाले आहे.
यावेळी लाभधारक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी बॅंक मॅनेजर ए. एन. लोंढे, विकास अधिकारी डी. आर. पारधी, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव सोपानराव नवले, विनायक धुमाळ, सुखदेव बुट्टे, दिलीपराव पवळे, सचिव मच्छिंद्र निघोजकर, लेखनिक संदेश बुट्टे, जयसिंग शिंदे, बाबाजी बुट्टे, शैला वाळुंज, दत्तात्रय पवळे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.