ट्रकचालक-मालकावर गुन्हा दाखल
नारायणगाव- नारायणगाव (ता. जुन्नर) पोलिसांनी शनिवार (दि. 21) रोजी 51 लाख 60 हजार 800 रुपयांचा गुटखा आणि 7 लाखांचा ट्रक असा 58 लाख 60 हजार 800 रुपयांचा माल जप्त केला होता. नारायणगाव पोलीस ठाण्यात आज (दि. 23) ट्रकचालक आणि मालक यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे साहायक आयुक्त बी. एम. ठाकूर आणि अन्न सुरक्षा अधिकारी वंदना रुपनवर यांनी दिली.
ट्रकचालक रमेश बाजबाहदूर सिंग (वय 33, मूळ रा. कटरा बाजार, उत्तरप्रदेश) आणि मालक संजय संभाजी इंगवले (रा. भिवंडी, ठाणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अन्न सुरक्षा अधिकारी वंदना रुपनवर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. याबबत पुढील तपास नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक भीमा लोंढे करीत आहेत.
- पकडलेला अवैध माल
38 लाख 28 हजार रुपये किमतीचा 4 हजार किलो विमल मान मसाला जांभळा व ब्राऊन, 5 लाख 64 हजार 800 रुपये किमतीचा 335 किलो व्ही 1 ब्राऊन तंबाखू, 5 लाख 76 हजार किमतीचा 168 किलो आरएमडी पान मसाला, 1 लाख 92 हजार किमतीचा 12 किलो एम सुगंधित तंबाखू असा 51 लाख 60 हजार 800 रुपयांचा माल आणि 7 लाख रुपये किमतीचा ट्रक (एमएच 04 एफजे 8460). एकूण 58 लाख 60 हजार 800 रुपयांचा माल.