पाबळ: के बी पी इंटरनॅशनल स्कुल (थापेवाडी) पाबळ या प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन येत्या 24 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ.चंद्रभान मेंगाने यांनी दिली.
यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील,जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, व शिरूर पंचायत समितीचे उपाध्यक्ष विश्वास कोहोकडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर यावेळी संस्थेने केलेल्या विविध प्रशिक्षण योजना,विद्यार्थ्यांची प्रगती,सांस्कृतिक कार्यक्रम व विशेष प्रशिक्षण योजनेची व्याप्ती दर्शविण्यात येणार असल्याची तसेच प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य चंद्रभान मेंगाने यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी शिरूर गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे,विस्तार अधिकारी वंदना शिंदे, केंद्रप्रमुख सुपेकर, पाबळच्या सरपंच पल्लवी डहाळे व मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पुणे येथील आदित्य चॅरिटेबल ट्रस्ट संचलित केबीपी स्कुलच्या कार्यक्रमासाठी ट्रस्टचे अध्यक्ष प्रा.एन डी पिंगळे सर व सचिव शीतल टिळेकर उपस्थित राहून विशेष मार्गदर्शन करणार असल्याची माहिती प्राचार्य मेंगाने यांनी दिली.