नवी दिल्ली : टिडीम रोड एथलेटिक यूनियन (टीआरएयू) एफसी संघाने हिरो आय लीग फुटबाॅल स्पर्धेत रियल काश्मीर एफसी संघास २-२ ने बरोबरीत रोखत गुणतालिकेत आपल्या गुणाचं खातं उघडले आहे. गुणतालिकेत २ गुणांसह रियल काश्मीर ९ व्या तर टीआरएयू संघ १ गुणासह १० व्या स्थानी आहे.
.@officialtraufc make a 💥 comeback 🔙↩️ to open their account 🧾 in maiden #HeroILeague 🏆 campaign. 💯 class performance.
TRAU 2⃣-2⃣ RKFC#HeroILeague 🏆 #IndianFootball ⚽ #LeagueForAll 🤝 #TRAURKFC ⚔ pic.twitter.com/9pvScYdqWw
— Hero I-League (@ILeagueOfficial) December 22, 2019
रियल काश्मीरकडून २७ व्या मिनिटाला मेसन रोबर्टसनने पहिला गोल केला. रियल काश्मीरचा संघ पहिल्या सत्रापर्यत १-० ने आघाडीवर होता.
त्यानंतर दुस-या सत्रात टीआरएयू संघाने आकम्रक खेळ केला. दुस-या सत्रात एमेका प्रिंसविलने ७८ व्या आणि पैट्रिक उचेने ८२ व्या मिनिटाला गोल करत संघास २-१ ने आघाडीवर नेले. पण, ही आघाडी जास्त काळ टिकू शकली नाही. रियल काश्मीरच्या मेसन रोबर्टसनने सामन्याच्या ८३ व्या मिनिटाला गोल करत संघास २-२ ने बरोबरीवर आणले आणि हा सामना बरोबरीत सुटला.