नगर -लॉकडाऊनच्या काळात अनेक गरजू, स्थलांतरित मजूर, हॉस्पिटलमधील कर्मचारी, पोलीस प्रशासन, महानगरपालिकेचे कर्मचारी यांची उपासमार टळावी. यासाठी हेल्पिंग हॅन्ड्स फॉर हॅंगर्स ग्रुपच्या वतीने जीवाची पर्वा न करता जेवण पोहचविण्यात आले. हे कार्य युवकांसाठी आदर्शच असल्याचे, प्रतिपादन आरोग्य विभागाचे उपसंचालक स्वप्नील देशमुख यांनी केले.
प्रोफेसर कलनी जवळील जागा उद्योजक राजेंद्र मालू यांनी या अन्नछत्रासाठी विनामूल्य वापरासाठी दिलेली असून, एका छोटेखानी कार्यक्रमाअंतर्गत हेल्पिंग हॅन्ड्स फॉर हॅंगर्स ग्रुपच्या चांगल्या कामाची पावती म्हणून प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी न्यानेश्वर ढमाले, सुभाष तोडकर, महेंद्र त्रिगुने, चैतन्य खानवेलकर, सतीश ठोसर, संग्राम कदम, नाना भोरे, अविनाश मुडके, अनुपम खोंडे, किशोर कुलकर्णी उपस्थित होते.