T20 World Cup 2024 : ‘हे’ तिन्ही संघ पहिल्यांदाच खेळणार टी-20 विश्वचषक, करू शकतात मोठा उलटफेर….

T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेस उद्यापासून प्रारंभ होणार आहे. यावेळी या स्पर्धेचे आयोजन अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांनी केले आहे. स्पर्धेची सुरुवात अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील सामन्याने होणार आहे. जो डलासमध्ये खेळला जाईल. वेळेतील फरकामुळे हा सामना भारतात 2 जून रोजी होणार आहे. टी-20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात 2 जून रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 5:30 वाजता यूएसए आणि कॅनडामधील नाणेफेकीने होईल.
भारतीय संघाचे सर्व सामने रात्री खेळवले जातील ही भारतासाठी आनंदाची बाब आहे. यावेळी या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी झाले आहेत. ज्याची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. भारतीय संघ अ गटात आहे. यावेळी तीन नवीन संघही जोडले गेले आहेत, जे या स्पर्धेत पदार्पण करतील. हे संघ युगांडा, यजमान संघ अमेरिका आणि कॅनडा आहेत. चला तर मग जाणून घेऊया या संघांबद्दल….
युगांडा : युगांडाचा संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची ही पहिलीच वेळ आहे. आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या क्वालिफायर सामन्यात युगांडाने रवांडाचा 9 गडी राखून पराभव करत टी-20 विश्वचषकासाठी पात्रता मिळवली होती. युगांडानेही झिम्बाब्वेला हरवून मोठा उलटफेर केला होता. युगांडा जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक आहे. देशातील बहुतांश लोकसंख्या झोपडपट्ट्यांमध्ये राहते. अशा परिस्थितीत संघासाठी एवढ्या मोठ्या मंचावर खेळणे ही खरोखरच मोठी गोष्ट असेल. युगांडाचा ‘क’ गटात समावेश करण्यात आला आहे.
Uganda Squad : ब्रायन मसाबा (कर्णधार), साइमन सेसाजी, रोजर मुकासा, कॉस्मस क्येवुटा, दिनेश नकरानी, फ्रेड अकेलम, कैनेथ वैस्वा, अलपेश रमजानी, फ्रैंक न्सुबुगा, हेनरी सेन्योंडो, बिलाल हसन, रॉबिन्सन ओबुया, रियाजत अली शाह (उपकर्णधार), जुमा मियाजी, रोनक पटेल.
अमेरिका(यजमान संघ) : अमेरिकेत टी-20 विश्वचषक आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि नियमानुसार जो देश या स्पर्धेचे आयोजन करतो. तो या स्पर्धेसाठी आपोआप पात्र समजला जातो. अमेरिकेत क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी या देशाला यजमान बनवण्यात आले आहे. टीम इंडिया लीगचे सर्व सामने अमेरिकेतच खेळणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात होणार आहे. या स्पर्धेतील ‘अ’ गटात अमेरिका आहे.
America Squad : मोनांक पटेल (कर्णधार/यष्टीरक्षक), आरोन जोन्स, अँड्रिज गॉस, कोरी अँडरसन, अली खान, हरमीत सिंग, जेसी सिंग, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोष्टुश केंजिगे, सौरभ नेत्रावलकर, शेडली वॅन शाल्क्विक, स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर. राखीव खेळाडू – गजानंद सिंग, जुआनोय ड्रायस्डेल, यासिर मोहम्मद
कॅनडा : कॅनडाचा संघही पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकात सहभागी होत आहे. या स्पर्धेसाठी कॅनडाचा ‘अ’ गटात समावेश करण्यात आला आहे. कॅनडा व्यतिरिक्त ‘अ’ गटात भारत, पाकिस्तान, अमेरिका आणि आयर्लंड यांचा समावेश आहे. या स्पर्धेतील पहिला सामना कॅनडा आणि अमेरिकेत होणार आहे. दोघांमधील ही टक्कर डॅलसमध्ये होणार आहे. तुमच्या माहितीसाठी, कॅनडा यापूर्वी मोठ्या मंचावर खेळला आहे ते म्हणजे कॅनडाचा क्रिकेट संघ चार वेळा एकदिवसीय विश्वचषकाचा भाग राहिला आहे.
Canada Squad : साद बिन जफर (कर्णधार), आरोन जॉन्सन, डिलन हेलिगर, दिलप्रीत बाजवा, हर्ष ठाकरे, जेरेमी गॉर्डन, जुनैद सिद्दीकी, कलीम सना, कंवरपाल तथगुर, नवनीत धालीवाल, निकोलस किर्टन, परघट सिंग, रविंदरपाल सिंग, रायनखान पठाण आणि श्रेयस मोहम्मद. राखीव – तजिंदर सिंग, आदित्य वर्धराजन, अममार खालिद, जतिंदर माथरू आणि परवीन कुमार.





