बंगळुरू : भारताची महत्वकांक्षी कामगिरी चांद्रयान-2 ला शेवटच्या क्षणी अपयश आले होते. दरम्यान,या घटनेला आता 14 दिवस उलटून गेले परंतू, विक्रम लॅंडरविषयी इस्रोला कोणतीही माहिती मिळवण्यात यश आले नाही. त्यावरच आज इस्रोचे प्रमुख के.सिवन यांनी माहिती दिली. विक्रम लॅंडरशी संपर्क होवू शकला नसून आता इस्त्रोने गगनयान मिशनवर लक्ष केंद्रीत केले असल्याचे सिवन यांनी यावेळी म्हटले.
ISRO Chief K Sivan: Chandrayaan-2 orbiter is doing very well. There are 8 instruments in the orbiter & each instrument is doing exactly what it meant to do.Regarding the lander, we have not been able to establish communication with it. Our next priority is Gaganyaan mission. pic.twitter.com/eHaWL6e5W1
— ANI (@ANI) September 21, 2019
चांद्रयान -2 विक्रम लॉंडर चंद्रावर उतरल्यानंतर 14 दिवस उलटून गेले आहेत. याविषयी माहिती देत इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी, विक्रम लॅंडरशी संपर्क स्थापित करण्यात आम्हाला यश मिळू शकले नाही. पण चांद्रयान-2 चा ऑर्बिटर अजूनही उत्तम प्रकारे काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच या कक्षामध्ये एकूण आठ उपकरणे आहेत. प्रत्येक डिव्हाइसचे स्वतःचे वेगवेगळे फंक्शन असतात. हे सर्व जण ठरल्याप्रमाणे हे काम करत असल्याचेही सिवन यांनी म्हटले.