नगर – मोहरमाच्या काळात कामावर असतांना साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्यांने गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यावर पैशाची उधळपट्टी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
पोलीस कर्मचाऱ्याने सराईत गुंडावर पैशाची उधळपट्टी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यावरून कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचारी शकील सय्यद याला निलंबित करण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात नगर शहरात मोहरम विसर्जन मिरवणूक निघाली होती.
त्यात नगर शहरातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेला गुन्हेगार रशिद अब्दुल अजिज उर्फ रशिद दंडा हा गुन्हेगार सहभागी झाला होता. त्यावेळी बंदोबस्ताला असलेला कोतवाली पोलीस ठाण्याचा साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्याने गुन्हेगार रशिद दंडा याच्यावर पैसे ओवाळत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानुसार कारवाई करण्यात आली.
पोलीस असो अथवा पोलीस अधिकारी यांनी गुन्हेगार असणाऱ्यांवर जास्तच मेहरबान झाल्यास तो पोलीस प्रशासनाला काळमी फासणार निर्णय असतो, हे कोतवालीतील शकिल सय्यद यांच्यावर झालेल्या निलंबित कारवाई मुळे उघड झाले आहे. आता प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांना पार्श्वभूमीपाहून समोरील व्यक्ती बरोबर संबंध ठेवण्यासाठी सावधानता बाळगावी लागणार आहे.