टांगेगल्लीतील धोकादायक इमारत जमीनदोस्त

नगर – शहरात सुरू असलेल्या पावसामुळे टांगेगल्लीजील ठाणेकर वाडयाचा जुनी इमारत कोसळली. यात 65 वर्षीय वृध्द महिला अडकली होती. मनपाच्या अग्शिमन पथकाने तिला सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे शहरातील जुन्या व धोकादायक इमारतींचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून मनपा प्रशासनाने तत्परता दाखवत शुक्रवारी ठाणेकर वाडा जमीनदोस्त केला.

गुरुवारी टांगे गल्लीतील ठाणेकर वाडा काहीसा कोसळला होता.यामध्ये उषा त्र्यंबकेश्‍वर कावस्कर (वय-65) असे या महिलेचे नाव आहे. ती एकटीच तेथे राहत होती.शहरातील कोर्ट गल्लीच्या पाठिमागे असलेल्या टांगेगल्लीत ठाणेकर वाडा म्हणून इमारत आहे. दिवसभर झालेल्या पावसाने ही इमारत अचानक कोसळली.

याची माहिती परिसरातील नागरिकांनी मनपाच्या अग्निशमन पथकाला दिली. अग्निशामक विभागानेतातडीने घटनास्थळी धाव घेत सदर महिलेला सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने या जुन्या वाड्याचा काही भाग कोसळला.

Leave A Reply

Your email address will not be published.