मुंबई: बॉलीवूडमधील अनेक स्टार्स लोकांच्या हृदयावर राज्य करतात. इथल्या कहाण्या देशाच्या भौगोलिक सीमांच्या पलीकडे जाऊन लोकांना आपलेसे करतात. एकीकडे परदेशी लोकांना हिंदी चित्रपटांचे वेड लागलेले असताना दुसरीकडे बॉलीवूडनेही अशा कलाकारांचे खुल्या मनाने स्वागत केले, जे भारताचे नागरिक नव्हते, पण आता हिंदी चित्रपटांमुळे राहिले आहेत.
मात्र, भारतीय फिल्म इंडस्ट्रीत असे अनेक स्टार्स आहेत जे खूप लोकप्रिय आहेत पण त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही. यातील काहींचा जन्म भारतात झाला नव्हता, तर काही परदेशी आहेत पण आता देसी झाले आहेत. आजही आलिया भट, कॅटरिना कैफ, दीपिका पादुकोण यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही, त्यामुळे त्यांना देशात मतदानाचा अधिकारही नाही.
बॉलीवूडच्या सुंदर आणि टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेल्या दीपिका पदुकोणचा जन्म डेन्मार्कमध्ये झाला आहे, त्यामुळे तिच्याकडे डॅनिश नागरिकत्व आहे. अशा परिस्थितीत दीपिकाला भारतात मतदानाचा अधिकार नाही. अक्षय कुमारने अनेक देशभक्तीपर चित्रपटांमध्ये काम करून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. अक्षय सोशल मीडियावर सुपरऍक्टिव्ह असतो. त्यालाही मतदानाचा अधिकार नाही कारण त्याच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व आहे.
बॉलीवूडची बबली अभिनेत्री आलिया भट्ट हिने तिच्या राझी चित्रपटात भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारून सर्वांची मने जिंकली. मात्र, तीही भारताची नागरिक नाही. आलियाची आई सोनी राजदान बर्मिंघम युकेची असून त्यांच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. आईप्रमाणे आलियाकडेही ब्रिटिश नागरिकत्व आणि पासपोर्ट आहे.
श्रीलंकेच्या माजी मिस युनिव्हर्स जॅकलीन फर्नांडिस यांचा जन्म मनामा (बहारिन) येथे झाला आणि तिच्याकडे श्रीलंकेचे नागरिकत्व आहे. जॅकलिनचे वडील एलरॉय फर्नांडिस हे श्रीलंकन तमिळ आहेत आणि तिची आई किम मलेशियाची आहे. जॅकलिनने ऑस्ट्रेलियातून शिक्षण घेतले आहे, त्यामुळे तिच्याकडेही भारतीय नागरिकत्व नाही आणि तिला येथे मतदानाचा अधिकार नाही.
कतरिना कैफचा जन्म हॉंगकॉंगमध्ये झाला. तिचे वडील काश्मीरचे आहेत, कतरिना ही ब्रिटिश नागरिक आहे आणि त्यामुळे तिला भारतात मतदानाचा अधिकार नाही. पासपोर्टमध्येही तिचे नागरिकत्व ब्रिटनचेच आहे.