चंद्रपूर : चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं; वऱ्हाडाचा टेम्पो उलटून 5 जण जागीच ठार

चंद्रपूर – लग्न आटोपून परतत असताना चालकाचं गाडीवरून नियंत्रण सुटल्याने वऱ्हाडाच्या आयशर टेम्पोचा सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार गावाजवळ गुरूवारी दुपारी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर सुमारे 20 वऱ्हाडी अपघातात जखमी झाल्याची माहिती आहे.

साहिल कोराम (14), रघुनाथ कोराम (41), कविता संजय बोरकर (35), वीणा घनश्याम गहाणे (26), वैभव लोमेश सहारे (30) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नापूर येथून विवाह आटोपून एकारा येथे वऱ्हाडी जात असताना टेम्पो उलटून हा अपघात घडला. स्थानिक नागरिक आणि मार्गावरील वाहनधारकांनी तातडीने मदत करत जखमींना सिंदेवाही रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.