खडकवासला – पुण्यात सिंहगड परिसरात मोरदरी गाव वस्ती जवळ एका बिबट्याचं दर्शन घडलं. हा बिबट्या परिसरात फिरत असताना डरकाळी फोडताना दिसला. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.
जसे जसे सिमेंटची जंगले वाढत जातील तसतसा वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीकडे कल वाढत चालला आहे. सिंहगड परिसरांमध्ये बिबट्याचे वास्तव्य असलेले समजले जातात. त्यातच आज परिसरात बिबट्या दिसल्याने नागरिकांत मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या डरकाळ्याचा आवाजाने नागरिक दहशती खाली असल्याचे पहायला मिळत आहे.
बिबट्याची डरकाळी अन् नागरिकांमध्ये दहशत…
मोरदरी गाव वस्ती परिसरातील बिबट्याने नागरिकांना दर्शन दिले आहे. हा बिबट्या मोठ्या आवाजात डरकाळी फोडताना पहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे बंद केले आहे. दिवसेंदिवस बिबट्या चे मानवी वस्तीत दर्शन होऊ लागले आहे.
अनेक भागात बिबट्याच्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर अनेक जण यात जखमी देखील झाले आहेत. हा विडिओ शिवानी आनिरूध्द यादव यांनी आपल्या कॅमे-यात कैद कला आहे . माजी पंचायत समीती सदस्य आनिरूध्द यादव यांनी प्रभात प्रतिनिधीशी ही संपर्क साधून ही माहीती कळवली .