IPL 2024 (RR vs PBKS Match 65, Toss Update) : आज प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या राजस्थान रॉयल्सचा सामना बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या पंजाब किंग्जशी होणार आहे. आयपीएल मधील हा 65 वा सामना गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. राजस्थान संघाने मागील तीन सामने गमावले असून त्यांचे प्रयत्न विजयी मार्गावर परतणे आणि गुणतालिकेत अव्वल दोन स्थान निश्चित करण्यावर केंद्रित असतील. दुसरीकडे, पंजाबलाही पराभवाचा सिलसिला संपवायचा आहे.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा राजस्थान राॅयल्स संघांच्या बाजूनं लागला आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून पंजाब किंग्जविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss Update 🚨
Rajasthan Royals elect to bat against Punjab Kings.
Follow the Match ▶️ https://t.co/IKSsmcpSsa#TATAIPL | #RRvPBKS pic.twitter.com/Y0pglUEwUO
— IndianPremierLeague (@IPL) May 15, 2024
राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील शेवटच्या 5 सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, राजस्थानने चार सामने जिंकले आहेत. या मोसमात झालेला शेवटचा सामना राजस्थानने एक चेंडू शिल्लक असताना 3 विकेटने जिंकला होता. अशा स्थितीत राजस्थानचा वरचष्मा आहे. दोन्ही संघांमध्ये एकूण 27 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 16 राजस्थानने तर 11 पंजाबने जिंकले आहेत.
दरम्यान, राजस्थान रॉयल्सने बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत. या कालावधीत संघाने 1 विजय आणि 1 पराभव पत्करला आहे. दुसरीकडे पंजाब किंग्सने या मैदानावर केवळ 1 सामना खेळला असून त्यात विजय मिळवला आहे. पंजाबने प्रथम फलंदाजी करत हा सामना जिंकला होता.
काल झालेल्या सामन्यात दिल्लीच्या विजयाचा फायदा राजस्थान रॉयल्सला झाला. राजस्थानचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. त्याचे 16 गुण आहेत. राजस्थान व्यतिरिक्त आणखी दोन संघांना 16 किंवा त्याहून अधिक गुण मिळू शकतात. राजस्थानचा आजच्या सामन्यासह अजून एक सामना बाकी आहे.