IPL 2024 Playoff Qualification Scenarios Explained : आयपीएल 2024 चा लीग टप्पा अंतिम टप्प्यात आहे. प्लेऑफसाठी अनेक संघांमध्ये संघर्ष सुरू आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांनी टॉप-4 मध्ये आपले स्थान निश्चित केल्यामुळे आतापर्यंत एकूण 5 संघांचे भविष्य निश्चित झाले आहे. प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा मुंबई इंडियन्स हा पहिला संघ ठरला असून त्यानंतर गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्जही बाहेर पडले आहेत. मात्र इतर 5 संघांपैकी कोणता संघ प्लेऑफमध्ये जाणार याबाबत चाहत्यांमध्ये आणि जाणकारांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
प्लेऑफमध्ये फक्त 2 जागा रिक्त…
केकेआर (KKR) चे सध्या 19 गुण आहेत आणि राजस्थान (RR) कडे 16 गुण आहेत, त्यामुळे त्यांना टॉप-4 मधून बाहेर काढणे आता शक्य नाही. सध्या, चेन्नई सुपर किंग्ज (CSK), सनरायझर्स हैदराबाद (SRH), दिल्ली कॅपिटल्स (DC), रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी लढत आहे. प्लेऑफमध्ये 2 जागा शिल्लक आहेत, फक्त 5 दिवस बाकी आहेत आणि फक्त पाच संघांमध्ये स्पर्धा सुरू आहे.
सीएसके जिंकताच ठरेल पात्र
चेन्नई सुपर किंग्जचे आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 13 सामन्यांत 7 विजय मिळवून 14 गुण झाले आहेत आणि संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. सीएसकेचा लीग टप्प्यातील शेवटचा सामना आरसीबीविरुद्ध आहे. हा सामना जिंकल्यानंतर चेन्नईचे 16 गुण होतील, ज्यामुळे संघ थेट पात्र ठरेल. जर सीएसके (CSK) ला बेंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला तर त्यांना आशा करावी लागेल की हैदराबाद (SRH) त्यांचे पुढचे दोन सामने मोठ्या फरकाने हरेल.
आरसीबीकडे नाही कोणताही पर्याय..
आरसीबीने सध्या 13 सामन्यांत 6 विजय मिळवून 12 गुण जमा केले आहेत. जर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफमध्ये जायचे असेल, तर त्यांना अखेरच्या सामन्यात सीएसकेने विजयासाठी दिलेले लक्ष्य 18.1 षटकांत किंवा त्याआधी गाठावे लागेल. किंवा स्कोअरचा (धावसंख्या) बचाव करताना, बेंगळुरूला 18 किंवा त्याहून अधिक धावांच्या फरकाने विजय मिळवणे आवश्यक असेल. यामुळे आरसीबीचा निव्वळ धावगती चेन्नईपेक्षा चांगली होईल आणि त्यांना प्लेआॅफ मध्ये स्थान मिळू शकेल.
दिल्ली कॅपिटल्सची शक्यता कमीच…
दिल्ली कॅपिटल्सने लीग टप्प्यातील त्यांच्या शेवटच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा 19 धावांनी पराभव केला होता. दिल्लीचा 14 सामन्यात 14 गुणांसह निव्वळ रन-रेट -0.377 आहे, त्यामुळे टॉप-4 वर पोहोचण्याचा त्याचा मार्ग खूप कठीण वाटतो. दिल्लीला आता एकही सामना खेळायचा बाकी नाही, मात्र सनरायझर्स हैदराबादचे अजून 2 सामने बाकी आहेत. सनरायझर्सने त्यांचे पुढील दोन सामने 194 धावांच्या फरकाने गमावले तरच दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफमध्ये जाऊ शकतात. अशा प्रकारे दिल्लीचा नेट रन-रेट हैदराबाद (SRH) पेक्षा चांगला होऊ शकतो.
सनरायझर्स हैदराबादला एका विजयाची गरज…
हैदराबादचे सध्या 12 सामन्यांतून 14 गुण आहेत आणि संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबादला अजूनही गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्जविरुद्ध सामने खेळायचे आहेत, हे दोघेही प्ले ऑफमधून बाहेर आहेत. हैदराबाद आपला पुढचा सामना जिंकून पात्र ठरू शकतो, तसेच हैदराबाद (SRH) पुढील दोन सामने जिंकून क्वालिफायर 1 मध्ये खेळण्याची संधीही मिळवू शकतो.
PAK vs IRE 3rd T20I : बाबर आझमने रचला इतिहास, विराट कोहलीला मागे टाकून केला विश्वविक्रम…
लखनौची दिल्लीपेक्षा स्थिती वाईट…
लखनौ सुपर जायंट्सची प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता दिल्ली कॅपिटल्सपेक्षा कमी आहे. जरी एलएसजीने साखळी टप्प्यातील शेवटच्या सामन्यात मुंबईला पराभूत केले, तरीही त्यांना टॉप-4 मध्ये पोहोचणे खूप कठीण जाईल कारण संघाची 13 सामन्यात 12 गुणांसह निव्वळ धावगती -0.787 आहे. लखनौला मुंबईविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल आणि त्यानंतर उर्वरित सामन्यांचे निकाल त्यांच्या बाजूने जातील अशी आशा त्यांना बाळगावी लागेल.