सासवड -अनेक दिवसांपासून रखडलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी (दि. 30) पार पडला. या मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख नेतृत्व अजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाली आहे.
याबद्दल पुरंदरमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा शपथविधी पार पडल्यानंतर सासवड शहरातील मुख्य चौकात फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला. या जल्लोषात पुणे जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य शिवाजी पोमण यांच्या मित्र परिवारातर्फे फटाके वाजवून हा आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी शिवाजी पोमण, भानुकाका जगताप, सचिन वरघडे, दत्तात्रय राऊत, शिवाजी साळुंखे, धोंडीबा कटके, सचिन वारघडे, केशव भाटे, शांताराम कटके यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने
उपस्थित होते.