राजेंद्र गुंड, दत्तात्रय वारे, श्याम कानगुडे सक्रिय; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत उत्साह
कर्जत – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच कर्जतच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. मंत्रीपद मिळणार हे निश्चित असल्याने अनेक कार्यकर्ते मुंबईत तळ ठोकून होते. शपथविधी आटोपल्यानंतर कर्जतचे राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र गुंड, युवा नेते श्याम कानगुडे, नितीन धांडे, सागर लोंढे, दत्तात्रय वारे आदींनी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीची दमदार एंट्री झाली आहे. त्यामुळे मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. त्यातच अजित पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्याने कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. कर्जत-जामखेडच्या विकासासाठी अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाचा मोठा फायदा होणार आहे.
प्रशासनावर पकड असणाऱ्या दादांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याचा सार्थ अभिमान वाटतो. दादांच्या निवडीमुळे अहमदनगर जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यास मदत होणार आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा !
मंजुषा गुंड , जिल्हाध्यक्षा, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस