पुणे: शहरातील पर्वती पायथा येथे असणाऱ्या सानेगुरुजी शाळेसमोरच्या एका इमारतीच्या पार्किंगमध्ये असणाऱ्या गाड्यांना मध्यरात्री आग लागल्याची घटना समोर आली आहे. इमारतीच्या पार्किंगमध्ये असणाऱ्या 11 गाड्यांना आग लागली असून गाड्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
पर्वती पायथा येथे असणाऱ्या सानेगुरुजी शाळेसमोरच्या एका इमारतीच्या पार्किंगमध्ये असणाऱ्या 11गाड्यांना अचानक आग लागली. या आगीत पार्किंगमध्ये असणाऱ्या 6 दुचाकी व 1 रिक्षा पुर्ण जळाल्या असून 4 दुचाकींना आगीची झळ लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणली असल्याचे म्हटले जात आहे.