पुणे – शिवाजीनगर मतदार संघातील सर्वच उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे आता येथून सध्या 13 उमेदवार आहेत. येथील चित्र सोमवारी चित्र स्पष्ट होईल. या मतदार संघातून महायुती-सिद्धार्थ शिरोळे आणि आघाडीकडून दत्ता बहिरट निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याशिवाय सुहास निम्हण यांना मनसेने उमेदवारी दिली आहे.