भीषण आगीत कंपनी खाक

पिंपरी – शेती पंपाच्या स्टार्टरसाठी लागणारे साहित्य बनवणारी कंपनी आगीत जळून खाक झाली. ही घटना रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास रहाटणी येथे घडली. लीडिंग फायरमन अशोक कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी चौकातील कंपनीला आग लागल्याची वर्दी अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार रहाटणी येथील अग्निशामक उपकेंद्राचा बंब थोड्याच वेळात घटनास्थळी दाखल झाला.

त्यानंतर संत तुकारामनगर पिंपरी येथील अग्निशामक मुख्यालयातून आणखी दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीचे स्वरूप लक्षात घेता प्राधिकरण चिखली आणि भोसरी येथील अग्निशामक उपकेंद्रातील बंबही घटनास्थळी पाचारण केले. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्‍यात आणण्यात अग्निशामक दलास यश मिळाले.

महालक्ष्मी हाइट्‌स या इमारतीच्या टेरेसवर लेझ कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून शेती पंपाच्या स्टार्टरसाठी लागणारी उपकरणे तयार करण्यात येतात. इलक्‍ट्रिकल शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या कंपनीत पंधरा कामगार कामाला आहेत. मात्र घटना घडली त्यावेळी एकच कामगार कामावर होता. त्यामुळे मनुष्यहानी टळली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here