पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये सायंकाळी आग लागली. सातव्या मजल्यावर ध्वजारोहनाच्या सागाच्या लाकडाला आणि लाकडी जिन्याला लागली. अग्निशमन दलाची मदत पोहचण्यापूर्वीच तेथील सुरक्षा रक्षकांनी धाव घेत फायर स्प्रेने आगीवर नियंत्रण आणले. तोवर अग्निशमन दलाचे गाडी घटनास्थळी पोहचली. जवानांनी काही मिनिटांतच पुढील कार्यवाही करत आग शांत केली.
औंध अग्निशमन दलाचे अधिकारी कमलेश सनगाळे म्हणाले, आम्ही घटनास्थळी पोहचल्यावर आठ व्होल्ट्सची विद्युतलाइन वर ओढून पाण्याचा मारा करत आग शांत करण्यात आली. ही वास्तू “हेरिटेज’ आहे. यातच वारा वाहत असल्याने आग भडकण्याची शक्यता होती. येथे डागडुजीचे काम सुरू होते. अग्निशमन केंद्र अधिकारी कमलेश सनगाळे, चालक अनिल निकाळजे, जवान वाजे, स्वप्नील वाघमारे, मोहिते, बुरुड, ओंकार कांबळे आणि लोहकरे यांनी मदत केली.