ओळखा पाहू हा बॉलीवूड स्टार कोण ?

मुंबई – बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, जे चित्रपटातील कॅरेक्टरवर त्याच्या लूकवर खूप मेहनत घेतात. तर काही हरहुन्नरी अभिनेते नेहमी आव्हानात्मक भूमिका स्वीकारून त्यांच्या चाहत्यांना नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतात. राजकुमार राव हा देखील आपल्या अभिनयाने नेहमीच सर्वांना आश्चर्यचकित करत असतो.

 

View this post on Instagram

 

Happy new year guys. #LUDO ?❤️@anuragbasuofficial @bhushankumar @tseries.official

A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao) on

राजकुमार रावने सध्या त्याच्या नव्या चित्रपटातील लुकचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकले आहेत. अनुराग बासूच्या आगामी लुडो चित्रपटात दोन पात्रांची भूमिका राजकुमार वठवत आहे. या दोन्ही भूमिकांचा लुक त्याने इन्स्टावर शेअर केलाय. यातल्या एका लुकमध्ये राजकुमार राव ओळखता देखील येत नाहीये.

राजकुमार रावने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याने महिलेचे कपडे घातले असून लाऊड मेकअप केलेला आहे. त्यामुळे त्याला सहजासहजी ओळखता येत नाहीये. लुडो चित्रपटात त्याच्यासोबत अभिषेक बच्चन, पंकज त्रिपाठी, आदित्य रॉय कपूर, सान्या मलहोत्रा आणि रोहित सराफ देखील काम करत आहे. २४ एप्रिल २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

#JudgeMentalHaiKya Promotions. Styling @thetyagiakshay @style.cell @dior Make up: @nitin.ntd Hair: @vijay.p.raskar

A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao) on


राजकुमार रावने आपला लुकची झलक दाखवून चाहत्यांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. तर दुसऱ्या लुकमध्ये देखील राजकुमार चांगलाच भाव खाऊन जात आहे. मिथुन चक्रवर्तीचा चाहता असल्याप्रमाणे त्याने त्याची ड्रेसिंग केलेली दिसून येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.