जाणून घ्या ! औषधी चिरफळेचे गुण ; पोटासंबंधी विकारांना करतो दूर

गोव्याकडे याना तिरफळे, कोकणात चिरफळे व काशीकडे तुंबल असे म्हणतात. ही लहान लहान मिऱ्याएवढी किंचित लाल काळसर अशी फळे अतिशय गुणकारी असतात.   ( szechuan pepper benefits  )

वातावर उपयुक्‍त : ही फळे खाल्ली असता वाताचे विकार बरे होतात.

पोटातील वायू कमी करते : पोटात वायू धरला असता , पोट  फुगले असता, परसाकडे साफ होत नसेल, म्हणजे तुंबलाचे किंवा त्रिफळाचे वस्त्रगाळ केलेले चूर्ण दीड ग्रॅम, चमचाभर आल्याच्या रसात घालून घ्याव. त्यामूळे वायू कमी होतो, पोटातील गॅसेस कमी होतात.

पोटात दुखत असल्यास : पोट दुखत असेल तेव्हा आले-लिंबाच्या रसात तुंबल द्यावे; दुखणे थांबते.   ( szechuan pepper benefits  )

भूक लागण्यासाठी : भूक लागण्यासही तुंबलाचे चूर्ण घेतात. या त्रिफळाच्या चूर्णात भिजेल इतका मध घालून रोज दोन वेळा हे तुंबल चूर्ण अर्धा ग्रॅम घ्यावे, चांगली भूक लागत. अन्न पचन होते.

घसा साफ होण्यासाठी : घसा बसला असता तुंबलाचे चूर्ण कोमट पाण्यातून घ्यावे, घसा साफ होतो.

कफामुळे आलेला चिकटा कमी करण्यासाठी : कफाने तोंडास चिकटा आला, अरूची आली तर नुसते तुंबल चूर्ण तोंडास चोळल्याने चांगली लाळ सुटून चिकटा कमी होतो व तोंडास रूची येते.

वांती, उचकीवर उपयुक्‍त : उलट्यांवर तसेच उचकी लागली तर मधाबरोबर त्रिफळाचे चूर्ण वारंवार चाटावे लगेचच उचकी थांबते.उलटीचे प्रमाण कमी होते.

दातखिळी बसल्यास : काहीवेळा काही लोकांमध्ये आकडी, आचके वरचेवर येऊन दातखिळी बसते., अगदी गच्च बसलेली दातखिळी कशानेही उघडत नसेल तेव्हा तुंबल चूर्ण तोंडात टाकावे, वायू कमी होऊन दातखिळी उघडते. अशाप्रकारे त्रिफळ किंवा तुंबल हे गुणकारी आयुर्वेदिय औषध आहे.  ( szechuan pepper benefits  )

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.