होय. तुम्ही वाचलंत ते टायटल बरोबर आहे. त्याकडे आपण नंतर येऊ. आधी थोडंसं गुगलविषयी जाणून घेऊ. सर्च इंजिनची क्वीन म्हणून गुगलला ओळखलं जातं, हेही खरं आहे. गुगलला क्वीन म्हटलं आहे, कारण गुगल हेल्पचा व्हॉईस स्त्रीच्या आवाजात असल्याने गुगल आता स्त्रीलिंगी अर्थात फेमिनाईन झालं आहे. गुगलवर एकावेळी जगभरात किती सर्च सुरु असतात, हे माहिती करुन घेतलं, तर डोळे चक्क पांढरे होतील. प्रत्येक सेकंदाला गुगल-राणीला जगभरातून किमान 40 हजार प्रश्न विचारले जातात. म्हणजेच एका दिवसांत गुगल-राणी किमान 3.5 बिलियन (साडेतीन अब्ज) प्रश्नांची उत्तरे देत असते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. वाचूया आणखी सविस्तर
सप्टेंबर 1998 मध्ये गुगलची स्थापना झाली, त्यावेळी ही राणी दररोज 10 हजार प्रश्नांची उत्तरे देत होती. एक वर्षानंतर म्हणजे सप्टेंबर 1999 मध्ये गुगलराणी एका सेकंदाला 10 हजार प्रश्नांची उत्तरे देऊ लागली होती. या एका वर्षात गुगलराणीने 3.5 दशलक्ष प्रश्नांची उत्तरे दिली होती. वर्ष 2019 मध्ये गुगलला 50 दशलक्ष पाने निर्माण करण्यासाठी एक महिना लागला होता. याच कामासाठी वर्ष 2012 मध्ये गुगलराणीला अवघे एक मिनिट लागले होते.
गुगलराणीला दररोज जे प्रश्न विचारले जातात, त्यातले 16 ते 20 टक्के प्रश्न हे प्रथमच विचारलेले असतात. गुगलराणी इतक्या वेगात तुमच्या प्रश्नाचे उत्तर कसे काय देत असेल, असा प्रश्न तुमच्यासह मलाही पडला होता. हाच प्रश्न मी खुद्द गुगलराणीला विचारला, तेव्हा तिने सांगितले की, ती तुमच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी 0.2 सेकंदात 1000 कॉम्प्युटर्सवरुन माहिती गोळा करते. हे ऐकूनच माझ्या पोटात गोळा आला.
गुगलवर तुम्ही काय सर्च करु इच्छित आहात, हे गुगलला लगेच समजतं कसं, हा प्रश्न तुमच्यासारखाच मलाही पडला होता. त्याचं उत्तरही गुगलराणीनंच दिलं. तुम्ही ज्या कॉम्प्युटर/लॅपटॉप/मोबाईल वरुन गुगल सर्व वापरत आहात, त्याचे लोकेशन आणि तुम्ही सर्च विंडोमध्ये टाईप करत असलेला पहिला-दुसरा शब्द (की-वर्डस) याची तुलना वेगवेगळ्या क्रॉसलिंक्सद्वारे गुगल बॅकएंडला करत रहातं, आणि पुढचे सर्च वर्डस गुगल तुम्हाला सुचवत रहातं. इतकंच नव्हे, तर गुगलराणीचं तुमच्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरही लक्ष असतं, आणि तुम्ही काय शोधत असाल, याचं एक स्टॅटिस्टीकल ऍनालिसिस गुगलकडं तयार असतं. यालाच बहुधा आर्टीफिशिअल इन्टेलिजन्स अथवा कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणत असावेत. (असावेत काय; म्हणतातच.)
गुगल राणी असेल, तर मग युट्युबला काय म्हणायचं?
गुगल म्हणजे क्वीन अर्थात राणी असेल, तर युट्युब आहे प्रिन्सेस अर्थात राजकन्या! युट्युब राजकन्या ही अशी सहाय्यक आहे, जी तुम्हाला अमर्याद ज्ञान देत रहाते. कोणती गोष्ट कशी करायची याचे थेट व्हिडीओ तुम्हाला पहायला मिळतात. त्या अर्थाने युट्युब म्हणजे ऑनलाईन युनिव्हर्सिटीच बनली आहे.
- नेकटाय कसा बांधायचा?
- सूत्रसंचालन कसे करायचे?
- किल्ली हरवलेले कुलूप कसे उघडायचे?
- रॅपलिंग करताना काय काळजी घ्यायची?
- मानचाऊ सूप बनवताना काय घटक वापरायचे?
-
फ्रेंच ट्वीस्ट हेअर स्टाईल कशी करायची?
- ऍकॉर्डीयन कसे वाजवायचे?
- कारचे टायर्स कसे बदलायचे?
- ऑनलाईन व्हिडीओ एडिटींग कसे करायचे?
- तुमचा ब्लॉग कसा तयार करायचा?
असे कितीही आणि कोणतेही विषय असतील, तर युट्युब प्रिन्सेसङ्ख तुम्हाला खूप मोठे मार्गदर्शन करत रहाते. त्यामुळे केवळ माहिती घ्यायची असेल, तर गुगलराणीङ्ख आहेच; पण कोणती गोष्ट कशी करायची, हे शिकायचे असेल, तर युट्युब प्रिन्सेसङ्ख हे गणित या दशकात नक्की झाले आहे. अमर्याद करमणूक, बातम्या, लक्षावधी सिनेमे, सर्व भाषांमधली गाणी, शॉर्टफिल्म आणि आता तर युट्युब लाईव्हद्वारे शिक्षण अशा सर्वच आघाड्यांवर युट्युबने मोठी बाजी मारली आहे.
युट्युबची सध्याची कामगिरी अशी आहे…
1. इंटरनेटवरील दुसरे सर्वात मोठे सर्च इंजिन
2. सर्वाधिक व्हिजिटर्स असलेली गुगलनंतरची सर्वात मोठी साईट
3. प्रत्येक मिनिटाला 500 तासांचे व्हिडीओ अपलोडस
4. नेटफ्लिक्स, फेसबुकसह अब्जावधी तासांचे व्हिडीओज रोज पाहिले जातात
5. 70 टक्के युट्युब मोबाईल फोन्सवर वापरले जाते
- मोबाईलवर व्हिडीओ पाहण्याचा प्रत्येकाचा दररोजचा कालावधी सरासरी 40 मिनिटांचा
- हाऊ टु म्हणजे एखादी गोष्ट कशी करायची, याचे सर्वाधिक 51 टक्के व्हिडीओज पाहिले जातात
- वेळ घालवण्यासाठी गाणी किंवा सिनेमे 28 टक्के लोक पाहतात
- ऑनलाईन शॉपींगसाठी 19 टक्के व्हिडीओज पाहिले जातात
-
बातम्या आणि जगातील घडामोडीही 19 टक्के युजर्स युट्युबवर पाहतात
- सर्वात लोकप्रिय चॅनल आहे टी-सिरीज आणि दुसरा डब्ल्युडब्ल्युई
- किमान 10 टक्के युजर्स कोणताही व्हिडीओ शेवटपर्यंत पहात नाहीत
- व्हिडीओच्या सुरुवातीच्या जाहिराती स्किप करण्याचे प्रमाण 76 टक्के आहे
- 40 टक्क्यांहून अधिक युट्युब चॅनल्स सहा आकडी रक्कम डॉलर्समध्ये कमावतात
- 93 टक्के व्हिडीओज हे म्युझिक अर्थात संगीतविषयक पाहिले जातात
युट्युबविषयीचे हे मुद्दे वाचून मला खात्री आहे की, तुम्हीही सर्वाधिक प्रमाणावर युट्युबच इथून पुढे वापरणार आहात. चोविड-19मुळे आलेल्या लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक वापरले गेलेले टूल म्हणून युट्युबने सर्वोच्च मानांकन मिळवले आहे. शिवाय या काळात मनोरंजन आणि ऑनलाईन शिक्षण च्च 89यामुळे 300 अब्ज वापरकर्त्यांची भर पडली आहे. त्यामुळे आजच्या काळात युट्युब हे सर्वाधिक लोकप्रिय टूल बनले आहे.
– श्रीनिवास वारुंजीकर