पेठ, (वार्तााहर) – राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्ड व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या वतीने पेठ (ता. आंबेगाव) गावामध्ये आर्थिक व डिजिटल साक्षरता अभियान कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात प्रामुख्याने 100 रुपयांत नवीन बचत खाते उघडणे, प्रधानमंत्री सुरक्षा विमा, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, अटल पेन्शन विमा आदी योजनांचे फॉर्म भरून घेण्यात आले.
तसेच शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज, सोनेतारण कर्ज, महिला बचत गटांना दिले जाणारे 7.5 लाखापर्यंत विना तारण कर्ज, दुचाकी वाहन कर्ज, चारचाकी वाहन कर्ज या सर्व कर्ज योजनांची माहिती देण्यात आली. तसेच बँक देत असलेल्या सुविधा यामध्ये आरटीजीएस एनएफटी ए. बी. बी. मोबाइल बँकिंग एसएमएस बँकिंग फिक्स डिपॉझिट लॉकर यांची माहिती देण्यात आली.
तसेच शेतीपूरक व्यवसायासाठी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमार्फत कर्ज वितरण केले जाते. माहिती बँक समन्वयक शुभम अरगडे यांनी दिली तसेच यावेळी बँक अधिकारी चपटे, पोखरकर, बाजारे आदी उपस्थित होते.