नगर, (प्रतिनिधी) – खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील. याचबरोबर केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले जाईल. नगर तालुका खरेदी विक्री संघाचा आदर्शवंत असा कारभार करू. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे नेतृत्वाखाली सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन निर्णय घेतले जातील, असे अध्यक्ष रावसाहेब शेळके यांनी सांगितले.
नगर तालुका खरेदी-विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून अध्यक्षपदी रावसाहेब पाटील शेळके यांच्या नावाची सूचना संचालक दत्तापाटील नारळे यांनी मांडली. तर अनुमोदन संचालक आसाराम वारुळे यांनी दिले. तसेच उपाध्यक्षपदी डॉ. मिनानाथ दुसुंगे यांच्या निवडीची सूचना संचालक संजय धामणे यांनी मांडली तर अनुमोदन बाबासाहेब काळे यांनी दिले.
या वेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, माजी सभापती विलास शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक कार्ले, संचलक संतोष म्हस्के, रेवन चोभे, सुरेश सुंबे, नूतन संचालक विठ्ठल पठारे, गोपीनाथ फलके, मंगेश बेरड, राजेंद्र ससे, अजिंक्य नागवडे,
अशोक कामटे, मंगल ठोकळ, मीना गुंड, जीवन कांबळे, उत्कृष्ट कर्डिले, संतोष पालवे, आदी उपस्थित होते. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी शुभांगी गोंड यांनी काम पाहिले. या वेळी उपस्थितांचे स्वागत कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रभाजी सूळ यांनी केले तर आभार उपाध्यक्षडॉ. मिनानाथ दुसुंगे यांनी मानले.