रत्नागिरी : गणपतीपूळे येथील समुद्र किनाऱ्यावर एका भल्या मोठ्या व्हेल माशाचे पिल्लू अडकले होते. मागील 40 तासांहून अधिक वेळ या माशाला जीवनदान देण्याचे प्रयत्न वनविभागाकडून सुरू होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. त्यामुळे व्हेल माशाला जीवदान मिळाले आहे.
सोमवारी (१३ नोव्हेंबर) समुद्राला ओहोटी असल्याने व्हेल मासा गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर आल्याचं पर्यटकांनी पाहिले होते. तेव्हा बोटक्लबच्या सदस्यांनाही हा व्हेल मासा दिसला. त्यामुळे त्यांनी तातडीने पावलं उचलत त्याला समुद्रात सोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु, महाकाय व्हेल माशाचं पिल्लू वाळूत रुतून बसलं होतं.
काल सकाळ पासून हे व्हेल माशाचे पिल्लू गणपतीपुळे समुद्र किनारी वाळूमध्ये वाहत आले होते,
कालपासून त्याला परत समुद्रात सोडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न प्रशासन व उत्साही तरुण मंडळींच्या वतीने चालू होते.
सुमारे 4 टन एवढे वजन असलेल्या बिचाऱ्या या पिल्लाला वाळुतून बाहेर काढणे शक्य होत… pic.twitter.com/haSVlhZN4n
— मी देवेंद्र 🚩Avadhut Kelkar (@kelkaravadhut) November 14, 2023
वीस फुटांहून अधिक लांब आणि पाच ते सहा टन इतका वजनाचं या व्हेल माश्याचं पिल्लू होतं. ओहोटी असल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनला अडथळे येत होते. या माशाला काही प्रथम उपचार देखील देण्यात आले होते. त्यानंतर समुद्रात भरतीला सुरुवात झाली होती. तेव्हा रेस्क्यू टीमनं खोल समुद्रात माशाला नेलं आणि त्याला समुद्रात सोडले. या प्रयत्नानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.