असे आहे…, व्हॉट्सअ‍ॅपचे बहुप्रतिक्षित ‘डार्क मोड’ फिचर

सोशल मीडिया मधील सर्वात अधिक वापरलेजाणारे आणि अल्पवधीत लोकप्रिय झालेले अ‍ॅप म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅप. मेसेज पाठवण्यासाठी सर्वाधिक वापरले जाणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपकडून सातत्याने नवनवीन अपडेट मिळत असतात.

दरम्यान, आता पुन्हा एकदा व्हॉट्सअ‍ॅपने काही नवीन फिचर जारी केले आहेत. “डार्क मोड” असे या नवीन फिचरचे नाव आहे. हे फीचर आयओएस आणि अँड्राईड प्लॅटफॉर्मवर जारी करण्यात आले आहे. लवकरच सर्व युजर्ससाठी हे अपडेट रोल आउट केले जाईल.

अनेक महिन्यांपासून या फीचरचे टेस्टिंग सुरू होते. काही दिवसांपुर्वीच कंपनीने या फीचरचा काळ्या रंगातील एक लोगो देखील आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लाँच केला होता. दरम्यान, कंपनीने ट्विटर या फीचरचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.