Vanchit Bahujan Aghadi। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बहुतांश पक्षाकडून उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आलीय. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या काही जागांचा पेच अद्याप कायम आहे. त्यातून मार्ग काढत याद्या जाहीर करण्यात येत आहेत. त्यातच वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली. परंतु, स्वतंत्र लढत असले तरीही त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला पाठिंबा दिला आहे.
प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीला दिला पाठिंबा Vanchit Bahujan Aghadi।
सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात सोशल मीडियावरून ही माहिती दिलीय. वंचित बहुजन आघाडीने गेल्यावर्षी ठाकरे गटाबरोबर युती जाहीर केली. त्यामुळे ते महाविकास आघाडीत जाणार असल्याचीही चर्चा होती. परंतु, इतर घटकपक्षातील मतभेदामुळे ठाकरे गटाबरोबर त्यांचं फिस्कटल्याने प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतून माघार घेतली. परिणामी आता महाराष्ट्रात तिहेरी लढत होत आहे. दरम्यान, ठाकरे गटाविरोधात उभे राहिलेले प्रकाश आंबेडकरांनी मात्र राष्ट्रवादीला पाठिंबा दर्शवला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने माझ्याविरुद्ध उमेदवार न देण्याची भूमिका घेत पाठिंबा जाहिर केला आहे. याबद्दल मी वंचित बहुजन आघाडीचे…
— Supriya Sule (@supriya_sule) April 2, 2024
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? Vanchit Bahujan Aghadi।
“बारामती लोकसभा मतदारसंघातून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने माझ्याविरुद्ध उमेदवार न देण्याची भूमिका घेत पाठिंबा जाहीर केला आहे. याबद्दल मी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे मनापासून आभार मानते. आपण माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात ही माझ्यासाठी अतिशय मोलाची बाब आहे. संविधानाच्या मूल्यांचे जतन करण्यासाठी आपण सदैव एकत्रित काम करु ही ग्वाही देते. पुन्हा एकदा धन्यवाद”, असं सुप्रिया सुळे म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांनी सुप्रिया सुळेंना पाठिंबा दर्शवल्याने बारामती लोकसभा मतदारसंघात आता दुहेरी लढत होणार आहे. वंचितचे कार्यकर्ते सुप्रिया सुळेंचा प्रचार करणार का? हा प्रश्नही याठिकाणी उपस्थित करण्यात येतोय.