आलिया भटने नुकतंच तिच्या प्रॉडक्शन हाऊस खाली बनलेल्या डार्लिंग्स चित्रपटाचा टीझर रिलीज केला. टीझरमध्ये आलियाचे डायलॉग आणि सायलेंट किलर लूक अतिशय धोकादायक वाटत आहे. ‘डार्लिंग्स’च्या या टीझरमध्ये आलियासोबत शेफाली शाह, रोशन मॅथ्यू आणि विजय वर्मा दिसत आहेत. ‘डार्लिंग्स’मध्ये आलिया अशा व्यक्तिरेखेत दिसत आहे, की ती चित्रपटाची नायिका आहे की खलनायक हे समजणे कठीण आहे.
टीझरबद्दल बोलायचे झाले तर आलिया आणि विजय एका कपलसारखे दिसत आहेत. विजय आलियाच्या मागे असताना, आलिया त्याच्यावर राग काढताना दिसत आहे. टीझरमध्ये, आलिया विंचू आणि बेडकाच्या मैत्रीची एक खतरनाक कथा सांगत आहे. आलियाच्या आत्तापर्यंतच्या अभिनयातील सगळ्यात वेगळी व्यक्तिरेखा ती यावेळी साकारताना दिसतेय.
टीझरमध्ये पोलिस स्टेशनचा एक सीन देखील समाविष्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये आलियाचे पात्र देखील नकारात्मक असल्याचे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात शेफाली आलियाच्या आईच्या भूमिकेत आहे. डार्लिंग्ज मर्डर मिस्ट्री टीझरवरून दिसते, आता चित्रपट रिलीज झाल्यावर कळेल की खून कोणाचा आणि गुन्हेगार कोण आहे. डार्लिंग्सचा सस्पेन्सफुल टीझर इथे पहा,
अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खानची रेड चिलीज प्रॉडक्शन कंपनी बनवत असलेल्या अभिनेत्री आलिया भट्टच्या होम प्रोडक्शनमध्ये डार्लिंग्स पदार्पण आहे. आलिया भट्ट, गौरी खान आणि गौरव वर्मा सहनिर्माता म्हणून चित्रपटाशी जोडले गेले आहेत. त्याचबरोबर चित्रपटाची कथा जसमीत के रीन यांनी लिहिली आहे. जसमीतने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही घेतली आहे. डार्लिंग्सच्या टीझरसोबतच त्याची रिलीज डेटही सांगण्यात आली आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर यावर्षी ५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.