मुंबई – आलिया भटचा डार्लिंग्स चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे. अशात नेटिझन्सनं तिच्या विरोधात सोहसील मीडियावर एक मोहीम सुरु केली आहे. ज्यानुसार ट्विटरवर बॉयकॉट आलिया भट हा हॅशटॅग ट्रेंड होताना पाहायला मिळाला. चित्रपटापूर्वी वाद होणं हा काही बॉलिवूडसाठी नवीन विषय नाही. परंतु आलियाला बॉयकॉट करण्याचं कारण समजल्यावर तुम्हालाही धक्का बसेल.
डार्लिंग्स चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. चित्रपटात काहीतरी भन्नाट असणार असं वाटत असतानाच आता याच चित्रपटावरून आलियाला बॉयकॉट करण्याची मागणी सोशल मीडियावरून केली जात आहे. नेटकऱ्यांचं म्हणणं आहे,’डार्लिंग्स’ चित्रपटात पुरुषांवरील घरगुती हिंसाचाराचा प्रचार केला जात आहे, जे की पूर्णतः चुकीचे आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आलिया बदला घेण्यासाठी तिच्या नवऱ्याला मारते असे दाखवण्यात आले आहे, यामुळे नेटिझन्स तिच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप करत बहिष्कार घालण्याची मागणी करत आहेत.
आलियाची हा चित्रपट उद्या म्हणजेच ५ ऑगस्टला नेटफ्लिक्सवर रिलीज केला होणार आहे. ट्रेलरमध्ये आलिया अक्षरशः आपल्या पतीवर विवध प्रकारचे अत्याचार करताना दाखवली आहे असं नेटीझन्सचं म्हणणं आहे म्हणूनच अनेकांनी सोशल मीडियावर आलियाला टार्गेट केल्याचे पाहायला मिळते.