‘हुकअप’ गाण्यातील आलिया टायगरचा पोल डान्स पहिला का?

मुंबई – अभिनेता टायगर श्रॉफ आणि आलिया भट यांचं ‘स्टुडंट ऑफ द इयर-2’ चित्रपटातील एक रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरले आहे. ‘हुकअप’ असं या गाण्याचं नाव असून, सध्या युट्यूबवर हे गाणं जोरदार व्हायरल होत आहे. ‘स्टुडंट ऑफ द इयर-2’ या सिनेमातलं हे तिसरं गाणं असून, या गाण्यामध्ये आलिया आणि टायगरची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

‘हुकअप’ हे गाणं नेहा कक्कर आणि शेखर रावजियनीने या गाण्याला आपला आवाज दिला आहे. या गाण्यामध्ये पहिल्यांदाच आलिया भटने पोल डान्स केला आहे. याआधी ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ मधील ‘द जवानी सॉन्ग’ आणि ‘मुंबई दिल्ली दियां कुडियां’ ही दोन गाणी रिलीज झाली असून, आता रिलीज झालेल्या ‘हुकअप साँग’ मधून आलिया भटनं जबरदस्त एंट्री मारली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.