लंडन : ब्रिटनची राजधानी असलेल्या लंडन शहरामध्ये सध्या एक चित्रपट महोत्सव भरला असून त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. आणि या चित्रपट महोत्सवातील सर्व चित्रपट स्मार्टफोनवर चित्रित करण्यात आले आहेत.
या चित्रपट महोत्सवात ब्रिटन,स्पेन, इराण,व्हेनेझुएला अशा अनेक देशातील चित्रपटांनी सहभाग नोंदवला आहे. माहितीपट थ्रिलर आणि सामाजिक चित्रपटांचा समावेश या महोत्सवामध्ये आहे. उत्सवात सहभागी झालेले काही चित्रपट एका मिनिटाच्या कालावधीसाठी असून काही चित्रपट एका तासाचे ही आहेत.
सामान्य लोक ज्या स्मार्टफोनचा वापर करतात त्याचा फोनचा उपयोग करून या चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. तरी सुद्धा या सर्व चित्रपटांची गुणवत्ता अव्वल दर्जाची आहे असे आयोजकांचे म्हणणे आहे.
गेल्या दीड वर्षांच्या कालावधीमध्ये नियमित पद्धतीने चित्रपटांचे चित्रीकरण करणे अशक्य झाल्याने अनेक निर्मात्यांनी स्मार्टफोनवर चित्रीकरणाचा मार्ग स्वीकारला असून त्यातूनच हा महोत्सव भरला आहे. चित्रपटांचा हा महोत्सव व्हर्च्युअल पद्धतीने भरवण्यात आला असून महोत्सवातील उत्कृष्ट चित्रपटांची घोषणाही ऑनलाईन पद्धतीनेच केली जाणार आहे.