Reliance Jio New Data booster Plan : रिलायन्स जिओ ही देशातील नंबर वन टेलिकॉम कंपनी आहे. जिओचे सध्या ४४ कोटींहून अधिक युजर्स आहेत. प्रीपेड आणि पोस्टपेड व्यतिरिक्त, कंपनी आपल्या ग्राहकांना अनेक उत्कृष्ट सेवा देखील प्रदान करते. यामध्ये ब्रॉडबँड योजनेचाही समावेश आहे. जिओच्या युजर्स साठी स्वस्त आणि महाग अशा दोन्ही ऑफर आहेत, तुम्ही तुमच्या बजेटनुसार प्लॅन निवडू शकता. युजर्सच्या सोयीसाठी, कंपनी वेळोवेळी आपल्या रिचार्ज प्लॅनची यादी अपग्रेड करत असते.
गेल्या काही वर्षांत इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढला आहे. हे लक्षात घेऊन कंपनी अनेक प्रकारचे डेटा प्लॅन देखील ऑफर करते. जिओने अलीकडेच आपल्या यादीत एक नवीन ऑफर समाविष्ट केली आहे. जर तुम्ही इंटरनेट वापरत असाल तर तुम्हाला जिओचा हा प्लान खूप आवडेल.
Jio चा 101 रुपयांचा जबरदस्त प्लान
Jio ने आपल्या ग्राहकांसाठी 101 रुपयांचा नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. जिओच्या या प्लॅनने यूजर्सचा फायदाच फायदा होणार आहे. कारण Jio या प्लॅनमध्ये ग्राहकांना 100GB डेटा देत आहे. डेटाच्या बाबतीत,हा प्लान कंपनीच्या काही मासिक प्लॅनपेक्षाही चांगला आहे. ज्यांना फक्त इंटरनेट सुविधा हवी आहे त्यांच्यासाठी ही योजना अधिक चांगली आहे. यामध्ये व्हॉईस कॉलिंग किंवा एसएमएस सुविधा उपलब्ध नाही.
अतिशय म्हत्वाचे
तुम्ही रिलायन्स जिओचा हा रिचार्ज प्लान घेण्याचा विचार करत असाल, तर कृपया लक्षात घ्या की हा सामान्य युजर्ससाठी नाही. कंपनीने हा प्लान Jio Air Fiber यूजर्ससाठी लॉंच केला आहे. 101 रुपयांच्या प्लॅनसोबत कंपनीने 251 रुपयांचा प्लॅनही लॉंच केला आहे. यामध्ये यूजर्सना 500GB डेटा मिळतो. लक्षात ठेवा की या दोन्ही योजना डेटा बूस्टर प्लॅन आहेत, त्यामुळे ते तेव्हाच कार्य करतील जेव्हा जिओ एअर फायबरमध्ये बेसिक प्लॅन सक्रिय असेल.