जमिन व्यवहारात सव्वा कोटीची फसवणूक करणारा जेरबंद

पुणे – जमीन व्यवहारात 1 कोटी 12 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एकाला पोलिसांनी रास्ता पेठ भागातून अटक केली. मनीष रमेश चावडा (रा.रास्ता पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पुणे-नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई भागातील शेतजमीन नावावर नसताना ती नावावर असल्याचा बनावट उतारा आरोपी मनीष, त्याचा भाऊ संदीप, पूनम सोलंकी आणि महेश सोलंकी यांना तयार केला होता. मार्केटयार्ड भागातील प्रवीण जगताप यांना या जागेची विक्री करण्यात आली होती. जगताप यांच्याकडून 1 कोटी 12 लाख रुपयांना या जमिनीची विक्री करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर चावडा अटक टाळण्यासाठी पसार झाले होते.

दरम्यान, मनीष चावडा रास्ता पेठ भागात राहत असल्याची माहिती समर्थ पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई निलेश साबळे यांना मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, नितीन अतकरे, संदीप शिंदे आदींनी चावडा याला ताब्यात घेतले. त्याला मार्केटयार्ड पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आले.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, नितीन अतकरे पोलीस कर्मचारी संदीप शिंदे, निलेश साबळे आदींच्या पथकाने केली

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.