कतार – फिफा विश्वचषकात फ्रान्सच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी केली. मात्र, रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात त्यांना अर्जेंटिना विरुद्धच्या सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा पराभव पत्करावा लागला. अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीने सामन्यात उकृष्ट कामगिरी करत आपल्या संघाला तब्बल ३६ वर्षानंतर विश्वविजेता बनवले. त्याचबरोबर या सामन्यात मेस्सीव्यतिरिक्त फ्रान्सच्या किलियन एमबाप्पेवर सर्वच चाहत्यांच्या नजरा रोखल्या होत्या. त्याने आपल्या संघासाठी जबरदस्त झुंज दिली. मात्र शेवटच्या क्षणी संघाला अपयश आले. दरम्यान, संघाच्या पराभवनंतर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन स्वतः आपल्या खेळाडूंना धीर देण्यासाठी मैदानात आले. त्यावेळीच हे क्षण पाहून सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले. त्यामुळे नेता असावा तर मॅक्रॉन यांच्यासारखा, असे म्हटले जात आहे.
#FIFA : 2026 साली होणाऱ्या ‘FIFA World Cup’ स्पर्धेबाबत फिफाची मोठी घोषणा
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अर्जेंटिनासोबतच्या पराभवानंतर आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन दिले. यावेळी त्यांनी प्रत्येक खेळाडूची भेट घेऊन त्यांना धीर दिला. याबाबतचा एक व्हिडिओ त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून शेअर केला आहे. संघाचा पराभव झाला असला तरी, फ्रान्सच्या युवा खेळाडू एमबाप्पेने आपल्या कौशल्याने लाखो फुटबॉलप्रेमींची मने जिंकली आहेत. त्याला यंदाच्या स्पर्धेत सार्वधिक गोलसाठी ‘गोल्डन बूट’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर लिओनेल मेस्सीने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा ‘गोल्डन बॉल’ हा पुरस्कार पटकावला.
#FIFA : 2026 साली होणाऱ्या ‘FIFA World Cup’ स्पर्धेबाबत फिफाची मोठी घोषणा
मेस्सीच्या नेतृत्वात अर्जेंटिनाने अवघ्या ३६ वर्षांनंतर तिसऱ्यांदा फिफा विश्वचषक जिंकला आहे. याअगोदर अर्जेंटिनाने १९७८ आणि १९८६ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यात यश मिळवले होते. त्याचबरोबर फ्रान्सने १९९८ आणि २०१८ मध्ये विजेतेपद जिंकलेले आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन हे सामना पाहण्यासाठी आणि आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी कतारला होते. यावेळी त्यांनी संघाचा पराभव झाला म्हणून निराश न होता आपल्या खेळाडूंना धीर दिला.
Fiers de vous. pic.twitter.com/9RMjIGMKGU
— Emmanuel Macron (@EmmanuelMacron) December 18, 2022
यावेळी मॅक्रॉन यांनी विजेत्या अर्जेंटिलादेखील शुभेच्छा दिल्या. आपल्या खेळाडूंवर संपूर्ण देशाला आभिमान असल्याचे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर पराभवामुळे थोडी निराशा झाली आहे, असेही त्यांनी म्हटले. मॅक्रॉन यांनी एमबाप्पेच्या खेळाचे तोंडभरून कौतुक केले. “एमबाप्पे हा एक महान खेळाडू आहे, त्याचबरोबर तो वयाने खूपच कमी असून तो फक्त २४ वर्षांचा आहे. महत्वाचं म्हणजे तो विश्वचषकातील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला.” असेही मॅक्रॉन यांनी म्हटले.
IGNORADO: Mbappe se quer olhou na cara do presidente Macron.
Só os franceses sabe o que passaram na mão do globalista/comunista Emmanuel Macron. pic.twitter.com/wDoLs6mrhz
— Mitonaro_2022 (@Tony35518718) December 18, 2022