न्युयॉर्क – कतारमध्ये यंदाची फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा पार पडली. आता 2026 साली ही स्पर्धा कॅनडा, मेक्सिको व अमेरिका या तीन देशांत संयुक्तपणे आयोजित केली जाणार असून त्यात परंपरेला बाजूला ठेवत 12 जादा संघ म्हणजेच एकूण 48 संघ सहभागी होणार आहेत.
जागतिक फुटबॉल महासंघाने (फिफा) नुकतीच ही घोषणा केली. याबाबत मते मागवण्यात आली असून येत्या महिनाअखेरीच फिफा याबाबत सविस्तर माहिती देणार आहे.
कॅनडा, मेक्सिको व अमेरिकेत होणारी 2026 सालातील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा नव्या स्वरूपात खेळवली जाणार आहे. यात पात्रता फेरीतून स्थान मिळवलेले 48 देशांचे संघ या स्पर्धेत सहभागी होतील. 1998 सालापासून या स्पर्धेत 32 संघ खेळतात, मात्र पुढील स्पर्धेत 48 संघ खेळताना दिसणार आहेत.
स्पर्धेच्या आराखड्यामुळे डोकेदुखी वाढणार
– स्पर्धेत 48 संघांचे सामने होणार असल्याने कालावधी वाढेल
– स्पर्धेत 4 संघांचे 12 गट होणार
– प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ बाद फेरीत
– अन्य आराखड्यानुसार 3 संघांचे 16 गट
– प्रत्येक संघ तीन सामने खेळणार
– प्रत्येक गटातील अव्वल 3 संघ बाद फेरीत
– युरोपमधून केवळ 3 संघ
– आशिया खंडातून तब्बल 8 संघ
– पात्रता स्पर्धाही त्यामुळे रंजक होणार