नाणे मावळ (वार्ताहर) – नाणे मावळ परिसरात बाजरीचे पीक जोमात आले आहे. बागायती पट्टा असलेल्या या परिसरात ज्वारी, बाजरी व गव्हाचे क्षेत्र अत्यल्प आहे. तरीही काही शेतकऱयांनी खरीप हंगामात बाजरीची लागवड झाली होती. सध्या हे पीक जोमात आले असून कणीस बाजरीच्या टोपऱया दण्यांनी भरले आहे.
या वर्षी नाणै मावळ परिसरात खरीप हंगामात अनेक शेतकऱयांनी बाजरीची लागवड झाली होती. हंगामी पिकांना शेतकऱ्यांना अपेक्षित उतारा मिळाला नाही. मात्र, बाजरीचे पीक जोमदार आले आहे. मागास हंगामातील बाजरीची वाढ चांगली झाली असून, टपोरे दाण्यांनी कणसे लगडली आहेत.
परिणामी, या वर्षी बाजरीचा उतारा चांगला मिळण्याची शक्यता आहे. मात्र, पक्ष्यांचे थवेच्या थवे बाजरी पिकावर अतिक्रमण करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिकाची राखण करताना दमछाक होत आहे.
शेतकऱ्यांनी पक्ष्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी पिकाच्या बाजूने साड्यांच्या कातड्या बांधल्याचे दिसत आहे. तसेच गोफण घेऊन शेतकरी सकाळ, संध्याकाळी पिकांची राखण करीत आहे. नाणे मावळातील कोंडीवडे परिसरात प्रगतशील शेतकरी हनुमंत चोपडे यांच्या शेतामध्ये बाजरीचे पीक जोमात आले असून टपोऱया दाण्यांनी कणसे भरली आहेत.