पुणे – पुणे जिल्हा फुटबॉल संघटने तर्फे पीडीएफए लीग फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मोशी येथील सिटी एफसी मैदानावर येत्या सोमवारपासून (15 नोव्हेंबर) सामने होणार आहेत.
करोना महामागरीमुळे प्रथम, व्दितीय आणि तृतीय श्रेणी गटाचेचे उर्वरित सामने रद्द केले गेले होते. हे सामने 31 डिसेंबर 2021 पुर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याचा निर्णय पीडीएफएच्या वार्षिक बैठकीमध्ये घेण्यात आला होता. तसेच पीडीएफए लीग स्पर्धेसाठीची नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार लीगचे सामने आणि नोंदणी प्रक्रिया आम्ही सुरू करत आहोत, असे पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव प्रदीप परदेशी यांनी सांगितले.
पीडीएफए लीग स्पर्धेत प्रथम श्रेणी, व्दितीय आणि तृतीय श्रेणी तसेच 16 वर्षाखालील गटाचे सामने होणार आहेत. फुटबॉल असोसिएशन ऑफ पुणे या नवीन संघटनेमध्ये सहभागी असलेल्या क्लबच्या विरूध्द पीडीएफएने कडक कारवाई केली होती. परंतु त्याचवेळी त्यांनी खेळाडूंचे व त्यांच्या भविष्यातील कारर्कीदीचे नुकसान होऊ न देण्याचाही निर्णय घेतला होता.
खेळाडूंना पीडीएफएच्या स्पर्धांमध्ये सहभागी होता यावे, यासाठी नवीन नोंदणीचा पर्याय खेळाडूंना देण्यात आला आहे. सर्व खेळाडूंसाठी असलेली ही तीन महिन्यांची नोंदणी (सर्व श्रेणींसाठी) 1 ऑक्टोबर 2021 पासून सुरू झाली होती. खेळाडूंच्या हितासाठी या नोंदणीची मुदत वाढविण्यात आली आहे.