नवी दिल्ली : राज्यभरात आजपर्यंत गौतमी पाटील आणि तिच्यासोबत येणारे वाद यामुळे ती सतत चर्चेत राहिली आहे. मात्र सध्या गौतमीची एका वेगळ्याच कारणाने सगळीकडे चर्चा सुरु आहे. ते कारण म्हणजे देशातील क्रिकेटप्रेमींवर आयपीएलचा फिव्हर जसा चढला आहे तसाच आयपीएलचा फिव्हर गौतमीवर चदला असल्याचे पाहायला मिळत आहे.
गौतमी पाटीलने एका मुलाखतीवेळी आवडता क्रिकेटर कोणता याचा खुलासा केला आहे. मुंबई इंडियन्स की चेन्नई सुपरकिंग असा प्रश्न विचारला असता गौतमीने मला मुंबई इंडियन्स आवडते असे सांगितले.
त्यानंतर आता गौतमीला कोणता क्रिकेटर आवडत असेल? असा सवाल उपस्थित केला. या प्रश्नाचं चटकन उत्तर देत गौतमीनं एमएस धोनी हे नाव घेतलं. क्रिकेट पाहायला देखील आवडतं असल्याचे गौतमीने सांगितले.
एका कार्यक्रमाचे दोन-अडीच लाख मानधन घेणाऱ्या गौतमीची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता तर महिला देखील गौतमी पाटीचा कार्यक्रमत आयोजित करत आहेत. महिला दिनानिमित्तानं पुण्यात गौतमीचा सत्कार देखील करण्यात आला. राजकीय कार्यक्रम असो, उद्घाटन असो किंवा बर्थ डे असो इतकंच काय तर बैलाच्या बर्थ डेला गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन केले जात आहे.