पुणे (सागर येवले)- कोथरूड गावठाण-शिवतीर्थनगर या बदलेला प्रभाग क्र. 31 असून पूर्वी हा प्रभाग 12 आहे. सध्या, या प्रभागात भाजपचे वर्चस्व आहे. तीन भाजप आणि एक शिवसेना अशी नगरसेवकांची संख्या आहे. मात्र, नव्याने बदल करण्यात आलेला प्रभाग “शिवसेने’साठी अनुकुल मानला जात आहे. त्यामुळे पूर्वी हातातून गेलेला बालेकिल्ला शिवसेनेला पुन्हा मिळू शकतो. 2014 मध्ये युती तुटली आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने बालेकिल्लयांवर वर्चस्व मिळविले. त्यानंतर 2017 च्या महापालिका निवडणुकीतही चारच्या प्रभागातही भाजपने वर्चस्व मिळविले. त्यावेळी शिवसेनेने एक जागा मिळवत आपले अस्तित्व टिकवून ठेवले. आता, नवीन प्रभाग बदलामध्ये खुद्द
विद्यमान नगरसेवक
गेल्या पंचवार्षिकमध्ये केलेले विशेष काम
प्रभागातील रस्ते आणि पदपथ प्रशस्त झाली. कमिन्सच्या ताब्यात असलेली जागा मिळविल्यामुळे येथील रस्ता प्रशस्त झाला. “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ या नवीन उद्यानाचे उद्घाटन होणार आहे. तसेच, मुलांसाठी डायनॉसर पार्क, टॉयट्रेन उभारण्यात आली आहे. मुरलीधर मोहोळ (भाजप)
मंत्री पार्क येथे पावसाळ्यात नाल्यातील पाणी सोसायट्यांमध्ये घुसून नुकसान होते, त्यामुळे येथे कलवट टाकण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या ठिकाणी 24 तास ज्योत तेवत आणि विद्युत रोषणाई केली. “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ नाट्यगृह लवकरच सुरू होत आहे. पृथ्वीराज सुतार (शिवसेना)
मंत्री पार्क येथे पावसाळ्यात नाल्यातील पाणी सोसायट्यांमध्ये घुसून नुकसान होते, त्यामुळे येथे कलवट टाकण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या ठिकाणी 24 तास ज्योत तेवत आणि विद्युत रोषणाई केली. “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ नाट्यगृह लवकरच सुरू होत आहे. पृथ्वीराज सुतार (शिवसेना)
निवडणुकीपूर्वी नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण करण्याचा आतोनात प्रयत्न केला. विकासकामाबरोबर प्रथमत: नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी आणि सुविधा देण्यासाठी 24 तास लोकांच्या संपर्कात राहून काम केले. “कै. सुमनताई भाजी मंडई’चे नुतनीकरण केले. वासंती जाधव (भाजप)
छत्रपती संभाजी महाराज विद्यालय याठिकाणी मुलांसाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि वर्ग खोल्या बांधण्यात आल्या. सुतार दवाखाना येथील प्रसूतीगृहाचे नूतनीकरण करण्यात आले. मयुर कॉलनीत मैदानासाठी निधीची तरतूद केली असून, लवकर मुलांना हे मैदान खुले होईल.हर्षाली माथवड (भाजप)
गतपंचवार्षिकचे लढवय्ये जनसेवक
प्रभागातील कामांबाबत त्यांचे मत…
या प्रभागात चांगले काम करण्याची संधी होती. रस्त्यांची कामे आजही पूर्ण झालेली नाहीत. ज्याठिकाणी दिवे लावलेत, ब्लॉक बसविले, ड्रेनेज लाइन टाकली. तीच पुन्हा काढायचा आणि नवीन बसवायची. त्यामध्ये नागरिकांना त्रास होतो आणि पैसाची नासाडी होते.शाम देशपांडे (शिवसेना)
सुतार दवाखान्यात आजही पुरेशा सुविधा नाहीत. शास्त्रीनगरसह परिसरातील पथारी व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष आहे. समन्वया अभावी याठिकाणी विकासकामे होण्यास वेळ लागत आहे. वस्ती भागात किमान दोनवेळा पाणी मिळणे आवश्यक आहे.महेश विचारे (कॉंग्रेस)
एकीकडे स्मार्ट सिटीचा बागुलबुवा करत असताना प्रभागामध्ये घाणीचे साम्राज्य आहे. ठोस विकासकाम झालेले नाही. आधीच्या नगरसेवकांनी कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. रंगरंगोटी, अनावश्यक वाचनालये, कमानी करून त्यावर आपल्या नावाची पाटी लावण्याची शर्यतच प्रभागामध्ये दिसून येते.सुप्रिया काळे (मनसे)
येथील भाजी मंडईचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आझादवाडी परिसरामध्ये नित्याची वाहनकोंडी होत असून वाहतुकीची समस्या सोडविण्यावर लोकप्रतिनिधी विचार करत नाही. प्रभागात उद्याने झाली, मात्र मुलांना खेळण्यासाठी हक्काची मैदाने नाहीत.शांता भेलके (शिवसेना)
2022 निवडणुकीसाठी इच्छुक
भाजप छ वासंती जाधव, हर्षाली माथवड, अजित जगताप, नवनाथ जाधव, दुष्यंत मोहोळ. राष्ट्रवादी कॉंग्रेस : गणेश माथवड, संजय वरपे, ऋषीकेश शिंदे, गिरीश गुरनानी, रोहिदास सुतार, दत्तात्रय मुळीक, संतोष मोहोळ, ज्योती सुर्यवंशी, संगीता मोहोळ, प्रेमलता जैन, रोहीणी कामठे, सुनीता मुळीक. कॉंग्रेस : राजेंद्र मगर, महेश विचारे. शिवसेना : पृथ्वीराज सुतार, ऍड. योगेश मोकाटे, शाम देशपांडे, उमेश भेलके, अंकुश तिडके. मनसे : किशोर शिंदे, सुधीर धावडे, संजय काळे, प्रशांत पायगुडे.