दुबई – भारताची अव्वल महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रीक्स हीला या महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार आयसीसीने जाहिर केला आहे. यंदाच्या मोसमापासून आयसीसीने प्रत्येक महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा खास गौरव करण्यास सुरुवात केली आहे.
इंग्लंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाच महिलांच्या टी-20 क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्यात भारतीय संघाला ब्रॉंझपदक मिळवून देण्यात जेमिमाचा मोलाचा वाटा होता, त्यामुळेच आयसीसीने तिचा गौरव केला आहे. या स्पर्धेत तिने 5 सामन्यात 146 धावा करत स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाचवे स्थान मिळवले होते.