मंचर, (प्रतिनिधी) – विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अवसरी बुद्रुक (ता.आंबेगाव) येथील कलाशिक्षक संतोष चव्हाण यांना महाराष्ट्र राज्य कला शिक्षक संघ व पुणे जिल्हा कलाशिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कलाक्षेत्रामध्ये दिला जाणारा आदर्श कला शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला,अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य अंकुश शिंगाडे यांनी दिली.
डॉ. डी. वाय. पाटील इंजीनियरिंग कॉलेज, आकुर्डी पुणे येथे प्रसिद्ध चित्रकार गुरुवर्य मिलिंद शिंपी, ज्येष्ठ सिने अभिनेत्री पद्मश्री नयना आपटे व इतर मान्यवर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन संतोष चव्हाण यांना गौरविण्यात आले. त्यावेळी संस्थेचे सहसचिव दीपक चवरे, विद्यालयाचे माजी प्राचार्य जगन्नाथ सुपेकर, प्रा. रामानंद वळसे पाटील, क्रीडा संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश टाव्हरे, परीक्षा विभाग प्रमुख बाबाजी चव्हाण,
बालाजी नागरगोजे, क्रीडा शिक्षक प्रवीण हिंगे पाटील व सचिन रोकडे उपस्थित होते. अठरा वर्षाच्या सेवेमध्ये संतोष चव्हाण यांना तीन वेळा आदर्श कला शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर महानाटकाची निर्मिती व दिग्दर्शन, आक्रोश लघु नाटकाचे लेखन आणि कोरोना जनजागृती पार्श्वभूमीवर मंचर येथे भव्य रांगोळी साकारली.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अँड विष्णूकाका हिंगे आणि संचालक,विद्यालयाच्या पर्यवेक्षिका माधुरी खानदेशे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी संतोष चव्हाण यांचे अभिनंदन केले.